करंजेपुल आठवडे बाजारात रिमझिम पावसामुळे ग्राहकांची तारांबळ ; भाजीपाला तेजीत
बारामती तालक्यातील सोमेश्वर नगर येथील महत्वाचा गणला जात असलेल्या करंजेपुल आठवडा बाजारात मंगळवारी दिवसभर हवामान खात्याने सांगितल्याने आज सर्वत्र मुसळधार पाऊस वर्तवला आहे सकाळपासून मुसळधार पाऊस झाला नाही परंतु , आठवडे बाजारात रिमझिमपावसामुळे ग्राहक व व्यापारी वर्गाची बरीच धांदल उडाली होती .
संध्याकाळच्या वेळेस फक्त पाऊसाचे वातावरण होते .. भाजीपाला घेण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी दिसून आली असे ग्राहकही पावसाचे वातावरण असल्याने आहे त्या भावातच भाजीपाला व तरकारी पीक घेत होते, त्यामुळे व्यापारी व शेतकरी वर्ग पालेभाज्यांना चांगला भाव मिळत असल्याने समाधानी होता.