करंजेपूल ग्रामपंचायत अंतर्गत "लाडकी बहीण योजना" राबवण्यात आली
सोमेश्वरनगर - बारामतीतील करंजेपुल ग्रामपंचायत अंतर्गत महाराष्ट्र शासनाने राबविण्यात आलेल्या मुख्यमंत्री 'लाडकी बहीण योजना' विषयक माहिती करंजेपूल ग्रामपंचायत कार्यालय येथे करंजेपुल ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच पूजाताई वैभव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली सर्व ग्रामस्थ महिलांना देण्यात आली, यामध्ये लाडकी बहीण योजना विषयक कसे अर्ज भरायचे व त्याचे असणारे फायदे याविषयी माहिती दिली व अंगणवाडी सेविका आशा ननावरे, करचे मॅडम, रेश्मा शेंडकर, सुनंदा पाटोळे, संयोगीता धुर्वे, घाडगे यांनी फॉर्म भरून ऑनलाइन केले.
याप्रसंगी उपसरपंच प्रवीण गायकवाड, सदस्य सुहास गायकवाड, सदस्य सीमा गायकवाड, मा. सरपंच वैभव गायकवाड, निलेश गायकवाड, तंटामुक्ती अध्यक्ष सूर्यकांत गायकवाड, गणेश शेंडकर, राजेंद्र गायकवाड, सुधीर गायकवाड, प्रदीप शेंडकर, , किरण गायकवाड, संभाजी गायकवाड सर, प्रकाश हुंबरे, कैलास मगर, दिलीप गायकवाड, सचिन शेंडकर,ग्रामसेवक सुजाता आगवणे,कर्मचारी श्रीकांत शेंडकर उपस्थित होते.