माळशिरस ! कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व रमेश खलीपे ज्युनियर कॉलेज पिलीव या प्रशालेत 'हर घर तिरंगा' या अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद
माळशिरस प्रतिनिधी - भारत देशाच्या स्वातंत्र्याला ७७ वर्ष पूर्ण होऊन ७८ वा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. महाराष्ट्र राज्यात "हर घर तिरंगा" अभियान २०२४ अंतर्गत १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत तिरंगा ध्वज फडकवण्याचे आवाहन करण्यात आले.
या निमित्त महाराष्ट्राचे शैक्षणिक व सांस्कृतिक अधिष्ठान असलेल्या आणि 'स्वावलंबी जीवन हेच आमचे ब्रीद'
या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचाराने भारलेल्या
रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व रमेश खलीपे ज्युनियर कॉलेज पिलीव ( तालुका माळशिरस) या प्रशालेत आज १३ ऑगस्ट रोजी तिरंगा ध्वज फडकवण्यात आला.प्रशालेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी मिळून ध्वजगीत, राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत सादर करून 'भारत माता की जय' व 'स्वातंत्र्य दिनाचा विजय असो' अशा घोषणा दिल्या.यानिमित्त भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या महान देशवासी यांचे स्मरण करून त्यांच्या बलिदानाला सलाम केला. त्या महापुरुषांचे योगदान वाया गेले नाही.असे गौरवउद्गार या प्रशालेतील मराठी विषयाचे प्राध्यापक व प्रभावी वक्ते प्रा. हनुमंत माने यांनी व्यक्त केले.याप्रसंगी प्रशालेचे सन्माननीय प्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक बंधू-भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.