सतरा वर्षा आतील मूल व मुली यांची नाशिक येथे निवड चाचणी संपन्न
टेनिस क्रिकेट असोसिएशन नाशिक व टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानाने सतरा वर्षाच्या आतील मूल व मुली यांचे दिनांक 4 ऑगस्ट रोजी नाशिक येथे निवड चाचणी पार पडली,
टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे सतरा वर्षाच्या आतील मूल व मुली यांचे राज्यस्तरीय सामने बारामती येथे 23 24 25 ऑगस्ट रोजी होणार आहेत. त्यानिमित्ताने नाशिक जिल्ह्यामधून दीडशे मुलांनी निवड चाचणी दिली, त्यामध्ये स्पिरिट क्रिकेट अकॅडमीच्या चार मुलांनी पण निवड चाचणी दिली, आराध्य सावंत सुधांशू ललवाणी, दुर्गेश खरोले, शिवराज भामरे,ह्या मुलांची नाशिक जिल्ह्याच्या टीम साठी निवड झालेली आहे. या सर्व मुलांना टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया व टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र यांच्या सचिव मीनाक्षी गिरी यांचे मार्गदर्शन मिळालं ही निवड चाचणी घेण्यासाठी नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव विलास गायकवाड व सहसचिव धनंजय लोखंडे नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे मेंबर व स्पिरिट क्रिकेट अकॅडमी चे सीनियर खेळाडू ओमकार पवार दर्शन थोरात हे उपस्थित होते, हे सर्व मुलं ऑलराऊंडर क्रिकेट खेळणारे आहेत. स्पिरिट क्रिकेट अकॅडमीच्या संचालिका नि सांगितलं की हे मुलं रोज दोन तास सराव करता ह्या मुलांची निवड झालेली आहे हे मुलं बारामती येथे खेळून, पुढे महाराष्ट्राच्या टीम साठी निवडली जाणार आहेत, यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे पुढील वाटचालीस मुलांना खूप खूप शुभेच्छा