लोणंद - फलटण रस्त्यावर शाळा परिसरात गतीरोधक व सुचना फलके लावावेत - कय्युम मुल्ला (अध्यक्ष साथ प्रतिष्ठाण)
लोणंद - आळंदी – पंढरपूर महामार्गातील लोणंद रेल्वे ब्रीज पासून ते फलटण दिशेने लोणंद पोलिस स्टेशन पर्यंत पंचक्रोशीतील रयत शिक्षण संस्थेच्या मालोजीराजे विद्यालय व ज्युनियर कॉलेज लोणंद , न्यू इंग्लिश स्कूल मुलींचे लोणंद तसेच विविध नागरी वसाहती आहेत . लोणंद रेल्वे ब्रीज पासून फलटण दिशेने वाहने खुप भरधाव वेगाने ये जा करित असतात या परिसरात पंचक्रोशीतील गावांचे विद्यार्थी बस अथवा खाजगी वाहनांने येतात तसेच येथील अबालवृद्ध नागरिकांना व विद्यार्थ्यांना सदर रस्ता जिव मुठीत घेऊनच पार करावा लागतो आहे. या शाळांच्या समोर रस्त्यावर अनेक भरधाव वाहनांमुळे नागरिक व विद्यार्थ्यांचा अपघात घडलेले आहेत. अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे तर बरेच जण मृत्युमुखी पडलेले आहेत. या ठिकाणी वाहने कंट्रोल करताना पलटी झालेली आहेत.
श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा लोणंद शहरातुन फलटण दिशेने गेले नंतर या रस्त्याची डागडुजी करून नव्या डांबरीकरण करण्यात आले आहे त्यामुळे अधिकच वाहन धारकांचे स्पिड वाढल्याचे दिसून येते आहे यामुळे वारंवार अपघात घडत आहेत. या ठिकाणी शाळा व नागरी वसाहती तसेच पोलीस स्टेशन आदी कार्यालये असल्याने येथील मार्गावर वाहन धारकांना सुचित करणारे तसे आवश्यक सुचना फलक लावून या शाळा परिसरात गतीरोधक /स्पिड ब्रेकर उभारणी होणे अत्यंत गरजेचे असल्याने या गंभीर समस्याची खात्री करून घेत सुचना फलक व गतीरोधक उभारणी होऊन विद्यार्थी, नागरिकांना दिलासा द्यावा. या लोकहिताचे मागणीची दखल घेतली गेली नाही तर आम्हाला लोकहितासाठी नाईलाजाने आंदोलने करावी लागतील व याची सर्वस्वी जबाबदारी आपले महामार्ग व्यवस्थापन अधिकारींवर राहील अशी विनंती मागणीचे निवेदन साथ प्रतिष्ठाण चे अध्यक्ष कय्युम मुल्ला यांनी महाप्रबंधक एवं परियोजना निदेशक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (सडक व महामार्ग परिवाहन मंत्रालय, भारत सरकार). प्रोजेक्ट इंप्लेमेनेशन युनिट पुणे. यांना दिले आहे.