स्वतंत्र दिनानिमित्त श्री सोमेश्वर शिवलिंग गाभारा आरास तिरंगामय ; दर्शनासाठी आलेले शिवभक्त आकर्षित.
बारामती/सोमेश्वरनगर - मुख्य संपादक विनोद गोलांडे
बारामतीतील करंजे येथील श्री क्षेत्र सोमेश्वर स्वयंभू शिवलिंग श्रावण मास यात्रानिमित्त महिनाभर येथे अवघ्या महाराष्ट्रातून नव्हे तर विविध जिल्हा तालुका मधून इथे शिवभक्त स्वयंभू शिवलिंग चे दर्शन घेण्यासाठी येत असतात .
गुरुवार दिनांक १५ ऑगस्ट भारत स्वतंत्र दिनानिमित्त सर्वत्रच शासकीय शाळा महाविद्यालय तसेच विविध संस्था कार्यालय येथे तिरंगा ध्वज फडकवला जातो या अनुषंगाने श्री सोमेश्वर स्वयंभू शिवलिंग गाभारा हा लाल ,पांढरा आणि हिरवा रंगांची फुले वापरत अतिशय सुंदर फुलांची सजावट करत सोमेश्वर शिवलिंग गाभारा व शिवलिंग पिंड ही तिरंगामय झाली होती ...दर्शनासाठी आलेल्या शिवभक्तांना ते एक वेगळेच आकर्षण झाल्याने स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घेत आणि तिरंगा ध्वजाचे सजावट पाहत स्वयंभू शिवलिंग शिवभक्तांनी मनोभावी दर्शन घेतले.
श्री सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट च्या माध्यमातून संपूर्ण श्रावण महिनाभर श्री सोमेश्वर शिवलिंग आकर्षक विविध प्रकारची फुले घेत सजावट नियोजन अमोल (पीनु) भांडवलकर, सागर भांडवलकर, सूरज भांडवलकर, शुभम भांडवलकर, चिंतामणी भांडवलकर हे करत असतात तर गुरुवार रोजी केलेली सजावट साठी प्रदिप पवार, श्रीकांत पवार ,मोहन ओझर्डे यांनी केले.