हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये
'श्रीकृष्ण जन्माष्टमी' निमित्ताने पुस्तक हंडी साजरी
बारामती -( मुख्य संपादक विनोद गोलांडे )
मएसोच्या हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शनिवार,दि. २४/०८/२०२४ रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने पुस्तक हंडी उत्साहात साजरी करण्यात आली.
पूर्व प्राथमिक विभागाचे विद्यार्थी आणि त्यांचे बाबा यांच्या नात्यातील स्नेह वृद्धिंगत करण्यासाठी *बाबांचे पाल्यांसोबत आनंद क्षण हा उपक्रम आनंददायी शनिवारी राबविण्यात आला. कामाच्या रोजच्या धावपळीत बाबा पालकांनी पाल्यांना Quality Time आवर्जून दिला पाहिजे, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. आजच्या या उपक्रमात विद्यार्थी आणि त्यांच्या बाबा पालकांनी एकत्रितपणे वेगवेगळ्या खेळांचा आनंद घेतला.
तसेच जन्माष्टमी निमित्ताने प्राथमिक विभागातील बालचमू बालकृष्णाचे चित्र रंगवण्यात रंगून गेले. प्राथमिक व माध्यमिक विभागाने पुस्तक हंडी फोडण्यासाठी अतिशय सुंदर पध्दतीने थर सादर केले. सर्व विद्यार्थ्यांनी यावेळी नृत्य करत आनंद व्यक्त केला.
दहीहंडी या पारंपारिक उत्सवाला आधुनिकतेची जोड ही काळाची गरज ओळखून आपली शाळा गेल्या ५ वर्षांपासून पुस्तक हंडी साजरी करत आहे. या पुस्तक हंडीमध्ये स्तोत्र, मंत्र, वैज्ञानिक माहिती, बोधकथा तसेच इतर विविध विषयांशी निगडित माहितीपर पुस्तके ठेवून हंडी फोडण्यात आली.
पुस्तक वाचनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगून विजेत्या गटाला हंडीतील पुस्तके बक्षीस म्हणून देण्यात आली. अशा प्रकारे चैतन्यमय वातावरणात वरुणराजाच्या हलक्या सरींमध्ये भिजत आपल्या शाळेत पुस्तक हंडी साजरी करण्यात आली.