शरद पवार साहेबांचे नातू योगेंद्र पवार यांनी ऊर्जा भवन येथे उपोषणाला पाठिंबा दर्शवला
पुणे: शरद पवार साहेबांचे नातू, मा. श्री. योगेंद्र (दादा) पवार यांनी ऊर्जा भवन येथे विविध विषयांवर सुरू असलेल्या उपोषणाला भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला. या उपक्रमाच्या दरम्यान, त्यांनी शिवसेना पुणे जिल्हा कार्याध्यक्ष मा. श्री. पप्पू माने, बारामती लाईव्हचे मुख्य संपादक अमित बगाडे, शिवसेना वाहतूक विभागाचे पुणे जिल्हाध्यक्ष मा. श्री. बापू भिसे, ऍड. आकाश दामोदरे, आणि भाजप युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य मा. श्री. आकाश दामोदरे यांची उपस्थिती नोंदवली.
या भेटीत योगेंद्र पवार यांनी उपोषणकर्त्यांशी संवाद साधला व त्यांच्या मागण्यांना आपला पाठिंबा दिला. या भेटीद्वारे त्यांनी उपोषणकर्त्यांचा मनोबल वाढवला आणि त्यांच्या समर्थनाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला.