लोणावळ्यातील गोरगरीबांची मुले इंग्रजी शाळांमध्ये शिक्षण घेऊ शकतील ... सरकारी शाळा तसेच सेमी-इंग्रजी शाळा सुरू झाल्या पाहिजेत- उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई - जन सन्मान यात्रेच्या निमित्ताने लोणावळ्यात संवाद सभा झाली, यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मी काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा उल्लेख केला.
लोणावळ्याला निसर्गाने भरभरून संपदा दिली आहे. महाबळेश्वर, पाचगणी, लोणावळा, माथेरान यांसारख्या पर्यटन स्थळांच्या विकासासाठी मी सतत प्रयत्नशील आहे. मावळ तालुक्यात २८०० कोटी रुपयांच्या विकास कामांची पूर्तता केली आहे. बोरघाट ते सिंहगड इन्स्टिट्यूट समोरील काम जोमाने सुरू आहे, ज्या अंतर्गत टनेल आणि ब्रिज बांधले जात आहेत, याचा फायदा निश्चितपणे होईल. कोयना, भंडारदरा, पवना धरण येथे जल पर्यटनाचा विकास करण्याचा आमचा मानस आहे.
लोणावळ्यातील गोरगरीबांची मुले इंग्रजी शाळांमध्ये शिक्षण घेऊ शकतील यासाठी राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करून दिला जात आहे. लोणावळ्यात सरकारी शाळा तसेच सेमी-इंग्रजी शाळा सुरू झाल्या पाहिजेत. लोणावळ्याच्या हिताच्या कामांसाठी स्थानिकांनी सुचवलेल्या प्रस्तावांवर विचार करून योग्य योजना आखल्या जातील.