मुंबई येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सोमेश्वरनगर येथील विद्यार्थ्यांचे यश
सोमेश्वरनगरः थर्ड इंटरनॅशनल कराटे चॅम्पियनशिप २०२४ असोसिएशनच्या वतीने मुंबई येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत बारामतीतील सोमेश्वरनगर येथील स्पर्धकांनी उत्तुंग यश प्राप्त केले मुंबई येथील अंधेरी क्रीडा संकुलात या स्पर्धा पार पडल्या यात भारत इराण नेपाळ म्यानमार श्रीलंका भूतान या देशातील खेळाडू सहभागी झाले होते या स्पर्धेत १० ते १२ या वयोगटात मुलींमध्ये खुशी अमित आतार (गोल्ड मेडल) तसेच वेदांत राहुल कांबळे गोल्ड मेडल व सियोन रजनीकांत गायकवाड ( गोल्ड मेडल) १२ ते १४ या वयोगटात सार्थक राजेंद्र सकाटे ( सिल्वर मेडल) शंभू पोपट कांबळे यांनी ( ब्रांझ मेडल) वर नाव कोरले यशस्वी स्पर्धकांचे असोसिएशनचे अध्यक्ष सिहान रेन यांनी अभिनंदन केले यशस्वी स्पर्धकांना संस्थेचे ग्रँडमास्टर प्रकाश रासकर यांचे मार्गदर्शन लाभले.