कोऱ्हाळे बुद्रुक येथे उमाजीराजे नाईक जयंती साजरी
सोमेश्वरनगर (हेमंत गडकरी) :- आद्य क्रांतिवीर उमाजीराजे नाईक यांची २३३ वी जयंती कोऱ्हाळे बुद्रुक येथे विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.
जयंतीनिमित्त राजे उमाजी नाईक तरुण मंडळाच्या वतीने कोऱ्हाळे येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष प्रकाश हुंबे, नंदकुमार खोमणे, अमित खोमणे, विनोद खोमणे, सुनील खोमणे, अमित मदने, मुख्याध्यापक अशोक देवकर उपस्थित होते.
यावेळी जेजुरी गडावरुन कोऱ्हाळे गावापर्यंत ज्योत आणण्यात आली.
नामदेवराव पाटील वाचनालयातही उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी वाचनालयाचे सचिव रघुनाथ शिर्के, ग्रंथपाल अनिल चव्हाण, किसन हगारे, हरिश्चंद्र पवार उपस्थित होते.
ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच रवींद्र खोमणे यांच्या हस्ते उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी पोलीस पाटील शरद खोमणे, ग्रामपंचायत सदस्य मोहन भगत, राहुल भगत, निलेश सोनवणे, ग्रामपंचायत कर्मचारी महादेव खोमणे, सिकंदर चव्हाण, तसेच उमाजी नाईक तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते