Type Here to Get Search Results !

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्ह्यात ५६ महाविद्यालयातील आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्ह्यात ५६ महाविद्यालयातील आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन
पुणे : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्ह्यातील ५६ महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे दुरदृष्यप्रणालीद्वारे २० सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी १२.३० वाजता उद्घाटन होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे. 


नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीला सकारात्मक वातावरण निर्मिती होण्यासाठी तसेच युवक युवतींना कौशल्य विकासाची संधी महाविद्यालयामध्ये उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने "आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र" ही नाविन्यपूर्ण योजना सुरु केली आहे. महाविद्यालयात कौशल्य प्रशिक्षण केंद्र स्थापन करून 15 ते 45 वयोगटातील युवक-युवतींना कौशल्य विकास प्रशिक्षण प्रदान करून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. 


जिल्ह्यातील डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (पिंपरी), नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्था (तळेगाव दाभाडे), कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय (इंदापूर), शंकरराव भेलके महाविद्यालय (नसरापूर), शारदाबाई पवार महिला कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (शारदानगर-बारामती), अण्णासाहेब मगर कॉलेज (हडपसर), डॉ. डी. वाय. पाटील बायोटेक्नोलॉजी आणि बायोइनफोरमॅटीक इन्स्टिट्युट (ताथावडे), सेंट व्हिन्सेंट कॉलेज ऑफ कॉमर्स (पुणे), जे.एस.पी.एम भिवराबाई सावंत पॉलिटेक्निक (वाघोली), शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय (अवसरी खुर्द), वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट (पुणे), स्कूल ऑफ फार्मसी अँड रिसर्च सेंटर (बारामती), समर्थ पॉलिटेक्निक (बेल्हे) सुभाष बाबुराव कुल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (केडगाव), एसव्हीपीएम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड इंजिनिअरिंग (माळेगाव), सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (किवळे), विठ्ठलराव थोरात औद्योगिक प्रशिक्षण संस्था (भिगवण), गिरिजाई नर्सिंग कॉलेज (शिरुर), जयहिंद कॉलेज ऑफ फार्मसी (वडगाव सहानी), टिकाराम जगन्नाथ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (खडकी), श्री जैन विद्या प्रसारक मंडळ सांगवी केशरी कला व वाणिज्य महाविद्यालय (पिंपरी), प्रीतम प्रकाश कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स (भोसरी), प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज (पिंपरी), इंडीयन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन (पुणे), एमकेएसएसएस मनीलाल नानावटी व्होकेशनल इन्स्टिट्युट फॉर वमेन (कर्वे नगर), नवसह्याद्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पॉलिटेक्निक (नायगाव-नसरापूर), भिवराबाई सावंत कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड रिसर्च (नर्हे), श्री. फत्तेचंद जैन विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय (पिंपरी), सौ. ताराबाई शंकरलाल मुथ्था कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स (पिंपरी), एशियन कॉलेज ऑफ फार्मसी (धायरी), गर्व्हेन्मेंट पॉलिटेक्निक (पुणे), शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय (बारामती), एशियन कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स (धायरी), हरिभाई देसाई कॉलेज (पुणे), लोटस बिझनेस स्कूल (मुळशी), डॉ. शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ एमबीए (कृषी-व्यवसाय) (बारामती), डॉ. प्रा. रामकृष्ण मोरे आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज (आकुर्डी), श्रीमती. गेंदीबाई ताराचंद चोपडा कनिष्ठ महाविद्यालय, (चिंचवड), एमईएस गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स (पुणे), समर्थ कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट (बेल्हे), मराठवाडा मित्र मंडळाचे पॉलिटेक्निक (पिंपरी-चिंचवड), कृषी विकास प्रतिष्ठान शारदाबाई पवार औद्योगिक प्रशिक्षण संस्था (शारदानगर, बारामती), अनंतराव थोपटे महाविद्यालय व संशोधन केंद्र (भोर), इरा एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ एज्युकेशन (आर्वी), कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय (खेड-शिवापूर), डॉ. डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस (वराळे-तळेगाव), बी.डी.काळे महाविद्यालय (घोडेगाव), पद्मश्री आप्पासाहेब पवार कृषी पॉलिटेक्निक (बारामती), एमकेएसएसएस ॲकॅडमी ऑफ इनफोर्मेशन टेक्नोलॉजी (कर्वेनगर), शारदाबाई पवार इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग (शारदानगर, बारामती), डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय (आकुर्डी), एमकेएसएसएस महेंद्रा नानावटी इन्स्टिट्यूट ऑफ लेसर टेक्नॉलॉजी अँड ऍप्लिकेशन्स (कर्वे नगर), राजगड ज्ञानपीठ टेक्निकल कॅम्पस पॉलिटेक्निक (भोर), विद्या प्रतिष्ठानचे पॉलिटेक्निक कॉलेज (इंदापूर) महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, स्किल डेव्हलपमेंट सेंटर (कर्वे नगर) व अरहम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज (पुणे) या महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्राचे उद्धाटन करण्यात येणार आहे. 

या कार्यक्रमाच्या उद्धघाटनप्रसंगी प्रधानमंत्री श्री. मोदी मार्गदर्शन करणार आहेत. तरी जिल्ह्यातील अधिकाधिक युवक-युवती, विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ व मान्यवरांनी नजीकच्या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमाकरीता उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test