सोमेश्वर कारखाना रस्तावरील... त्या खड्ड्यामुळे होतं आहेत अपघात;
सोमेश्वरनगर - सततच्या पावसामुळे सर्वत्रच रस्त्यावर जीवघेणे मोठे खड्डे पडलेले आहेत सोमेश्वर कारखाना रस्त्यावरील भोसले इंटरप्राईजेस दुकानासमोर मोठा खड्डा पडलेला आहे सततच्या पावसामुळे येथे कायमच पाणी साचलेले असते याचा नाहक त्रास विद्यार्थ्यांना कारखान्यात येणाऱ्या कामगारांना होत आहे सोमेश्वर हायस्कूल पब्लिक स्कूल तसेच सोमेश्वर कारखाना असल्याने हा रस्ता मोठा वर्दळीचा असते अचानक आलेल्या खड्ड्यामध्ये अनेक दुचाकी पुरुष महिला तसेच शालेय विद्यार्थी खड्ड्याचा अंदाज न आल्याने पडल असल्याचे स्थानिक व्यावसायिक यांनी बोलताना सांगितले .
सोमेश्वरनगर करंजेपुल येथील मंगळवार आठवडे बाजार व शुक्रवार वाणेवाडी येथील आठवडे बाजार असल्याने मोठी गर्दी असते तसेच मोठे शिक्षण संकुल व मोठी बाजारपेठ असल्याने करंजेपूल करंजे, चौधरवाडी,भापकरमळा,माळवाडी,देऊळवाडी ,जोशीवाडी,रासकरमळा,मागरवाडी, सोरटेवाडी, होळ वडगाव निंबाळकर, कोऱ्हाळे येथील विध्यार्थ्यांचे व नागरिकांना कारखाना कामगार याच मार्गाचा वापर करावा लागतो.
पुढील अपघात टाळण्यासाठी संबंधित प्रशासनाने यावर त्वरित लक्ष देत ते लवकरात लवकर बुजवावेत अशी मागणी प्रवाशांसह ग्रामस्थ विद्यार्थी पालक-नागरिक व सोमेश्वर पंचक्रोशीतून होत आहे .
फोटो ओळ - सोमेश्वर कारखाना रोड भोसले इंटरप्राईजेस समोर पडलेल जीवघेणा मोठा खड्डा.