उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्याकडून मेट्रोच्या कामाचा सकाळी सहा वाजता प्रत्यक्ष ठिकाणी जात पाहणी दौरा..!
पुणे - राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी आज सकाळी सहा वाजल्यापासून ऑन फिल्ड जाऊन पुण्यात सुरु असलेल्या मेट्रोच्या कामांचा आढावा घेतला. बाणेर, RBI चौक, संचेती हॉस्पिटल या ठिकाणी स्वतः जाऊन मेट्रोचा कामाचा आढावा घेतला. तसेच या दौऱ्यामध्ये मेट्रोचे सर्व अधिकारी उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी दादांना कामाची आत्ताची काय स्थिती आहे याची माहिती दिली. अजितदादांनी संबंधित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.