Type Here to Get Search Results !

विद्या प्रतिष्ठानमध्ये विद्यार्थ्यांनी गिरवले स्वसंरक्षणाचे धडे

विद्या प्रतिष्ठानमध्ये विद्यार्थ्यांनी गिरवले स्वसंरक्षणाचे धडे 
सोमेश्वरनगर- बारामती तालुक्यातील विद्या प्रतिष्ठानचे सोमेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेज सी.बी.एस.ई वाघळवाडी येथे  दिनांक ९ सप्टेंबर रोजी निर्भया पथक बारामती यांच्या मार्गदर्शनाखाली बालकांची सुरक्षितता समुपदेशनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी अमृता भोईटे पोलीस हवालदार निर्भया पथक बारामती यांनी अनौपचारिक पद्धतीने मुले व मुलींची संवाद साधत अतिशय गंभीर वाटणाऱ्या विषय सहज उलघडून दाखवला.
यामध्ये निर्भया पथकाच्या कार्याची पद्धती व व्याप्ती त्यांनी मुलांना सांगितली. दैनंदिन आयुष्यात काही अप्रिय प्रसंग ही आपणासमोर उभे राहतात. त्यांना धीराने सामोरे जात स्वसंरक्षण कसे करावे व शारीरिक बळाप्रमाणे युक्तीने व प्रसंगावधाने कसे यातून बाहेर पडावे यासाठी भोईटे यांनी मुलींना उत्तम मार्गदर्शन केले.
आपल्यावर होणाऱ्या प्रसंगाची योग्य प्रकारे चाहूल ओळखून गुन्हेगार प्रवृत्ती पासून स्वतःचे व आपल्या घरातील इतर भावंडांचेही संरक्षण कसे करावे याबद्दलही मुलांना मार्गदर्शन मिळाले.
यावेळी शाळेतील मुलींनी मनमोकळेपणाने आपल्या मनातील विविध प्रश्नांना वाट मोकळी करून दिली. तर पाहुणेने अतिशय सोप्या व मार्मिक शब्दात मुलींचे शंकानिरसन केले.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आयोजन वर्षा मांढरे यांनी केले. शाळेतील मुख्याध्यापक सचिन पाठक तसेच विद्यार्थी व शिक्षकांची या कार्यक्रमाला उपस्थिती लाभली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test