बारामतीतील....त्या गणेश मंडळांनी लावले 'भावी मुख्यमंत्री' म्हणून बॅनर.
बारामती प्रतिनिधी - लवकरच राज्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. याच अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. अजित पवार हे रविवार दि १५ रोजी बारामती दौऱ्यावर होते. या दरम्यान अखिल तांदूळवाडी वेस तरुण मंडळाला भेट देताना अजित पवारांसाठी उभारलेल्या त्या बॅनरची नव्याने चर्चा झाली. अखिल तांदूळवाडी वेस तरुण मंडळाने या उभारलेल्या बॅनरमध्ये 'भावी मुख्यमंत्री' असा अजित पवारांचा उल्लेख केला होता. साहजिकच राजकीय वर्तुळात । त्याची चर्चा झाली नसती तरी मुख्यमंत्री पदाची अजित पवारांची महत्वकांक्षा लपून राहिलेली नाही. किंबहुना अजित पवार भाजपा बरोबर सत्तेत गेले आहेत, ते मुख्यमंत्री होण्यासाठीच असा त्यांच्या समर्थकांना ठाम विश्वास आहे.