उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात 'शक्ती पेटी' चे वितरण
बारामती : बारामती वकील संघटनेच्यावतीने आयोजित संवाद मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शक्ती अभियानाअंतर्गत शहरातील शाळेस प्रातिनिधिक स्वरुपात 'शक्ती पेटी' चे वितरण करण्यात आला.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, बारामती वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. प्रभाकर बर्डे, उपाध्यक्ष ॲड.प्रिती शिंदे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव आदी उपस्थित होते.
शहरातील विद्या प्रतिष्ठान हायस्कुल, विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, छत्रपती शाहू महाराज हायस्कुल, सातव हायस्कुल, न्यायालय परिसर, या ठिकाणी 'शक्ती पेटी'चे वितरण करण्यात आले. यावेळी शक्ती पेटी पथकाला किटचेही वाटप करण्यात आले.