आलेगाव येथील पूर्ण झालेल्या विविध विकास कामांचा लाेकार्पण साेहळा संपन्न.
दाैंड- आलेगाव येथील पूर्ण झालेल्या विविध विकास कामांचा लाेकार्पण साेहळा संपन्न. पुणे जिल्हा परिषदेचे मा.सदस्य व पुणे जिल्हा नियाेजन समितीचे सदस्य विरधवल जगदाळे तसेच पुणे जिल्हा नियाेजन समितीचे सदस्य,पुणे जिल्हा भाजपाचे अध्यक्ष मा.वासुदेव काळे यांच्या निधीतून आलेगाव काळे खंडाेबा मंदिर ते भीमानदी रस्त्याचे खडीकरण,माणिक काळे ते विनायक काळे,तसेच आलेश्वर मंदिर परिसरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण या विविध विकास कामांसाठी वासुदेव काळे व विरधवल जगदाळे यांच्या निधीतून सुमारे २० लाख रुपयांचा निधी दिला होता.
ठेकेदारांनी संबंधित कामे दर्जेदार केल्यामुळे दाेन्ही ठेकेदारांचा सन्मान करण्यात आला.यावेळी आलेगाव येथील कुमारी स्नेहा पाेपट काळे ही पुणे ग्रामीण पाेलीस दलात भरती झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने स्नेहा काळे हिचा वासुदेव काळे व विरधवल जगदाळे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी दाेन्ही मान्यवरांनी आलेगाव येथील विविध विकास कामांच्या दर्जाचे काैतुक करुन भविष्यात आलेगावच्या विकास कामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही.मात्र गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन विकासाची कामे केली पाहिजेत असे ते म्हणाले. शिवाजीराव काळे यांनी प्रस्ताविक करताना सांगितले की ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण केले पाहिजे.गावच्या विकास कामात काेणीही विनाकारण स्वार्थासाठी अडचणी निर्माण करुन गावाला वेठीस धरु नये.
यावेळी कदम, आवचर,गिरमकर,
काळे, इंगवले, चितारे, कुतवळ, दरेकर,गुणवरे,शेलार, एकाड,जराड, जठार,कडू, जाधव, शिंदे, ढमढेरे, रणशिंनगारे, डाेकडे,चव्हाण, पवार,नरसिंगे, आजी-माजी सरपंच, उपसरपंच,आजी-माजी चेअरमन, व्हाइस चेअरमन,सर्व ग्रामपंचायत व विकास साेसायटीचे सर्व सदस्य मान्यवर उपस्थित होते.