Type Here to Get Search Results !

निवडणूक खर्च निरीक्षक प्रेम प्रकाश मीना व ए. वेंकादेश बाबू यांची माध्यम कक्षाला भेट

निवडणूक खर्च निरीक्षक प्रेम प्रकाश मीना व ए. वेंकादेश बाबू यांची माध्यम कक्षाला भेट
पुणे, विधानसभा निवडणूक खर्च निरीक्षक प्रेम प्रकाश मीना (आयआरएस,) व ए. वेंकादेश बाबू (आयआरएस) यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेल्या माध्यम संनियंत्रण व जनसंपर्क कक्षाला भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली. यावेळी माध्यम कक्षाच्या कामकाजाबाबत निवडणूक खर्च निरीक्षकांनी समाधान व्यक्त केले.

निवडणूक खर्च निरीक्षक श्री.मीना आणि श्री.ए.वेंकादेश बाबू यांनी विविध माध्यमांमधील जाहिराती आणि पेड न्यूजबाबत कक्षातर्फे करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची माहिती घेतली. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी माध्यम कक्षाच्या कामकाजाविषयी माहिती दिली. अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा निवडणूक खर्च समन्वय अधिकारी सोनाप्पा यमगर, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्र विद्या विभागाचे सहायक प्राध्यापक योगेश बोराटे यावेळी उपस्थित होते. 

जिल्हा माहिती अधिकारी तथा माध्यम कक्ष समन्वय अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर, सहायक संचालक जयंत कर्पे यांनी माध्यम कक्षातर्फे तयार करण्यात येणाऱ्या विविध अहवालांची माहिती दिली.

माध्यम कक्षात सुमारे १० दूरचित्रवाणी संचांच्या माध्यमातून वृत्तवाहिन्यांतील निवडणूक प्रचार, जाहिरात, पेड न्यूज आदींच्या अनुषंगाने संनियंत्रण केले जात आहे. तसेच सोशल मीडियावरील पोस्टबाबतही बारकाईने संनियंत्रण केले जात आहे. वृत्तपत्रातील जाहिराती आणि पेड न्यूजबाबतही दररोजच्या वृत्तपत्रांचे अवलोकन केले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 

निवडणूक निरीक्षकांनी निवडणूक खर्च नियंत्रण कक्षाला भेट देऊन तेथील कामकाजाची माहिती घेतली. श्री. यमगर यांनी खर्च नियंत्रण कक्षातर्फे करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test