Type Here to Get Search Results !

अति महत्त्वाची सूचना...विधानसभा निवडणूक . वाहनांवर प्रचाराचे कापडी फलक..झेंडे.. लावण्यासाठी नियम.

अति महत्त्वाची सूचना...विधानसभा निवडणूक . वाहनांवर प्रचाराचे कापडी फलक..झेंडे.. लावण्यासाठी नियम.

जिल्ह्मात विधानसभा निवडणुकीच्याप्रचार मोहिमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार, निवडणूक लढविणारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते, हितचिंतकांना निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात येणा्या वाहनांवर पक्ष प्रचाराचे फलक, झेंडे लावण्यास जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी निर्बंधात्मक आदेश जारी केले आहेत.या आदेशान्वये फिरत्या वाहनांवर पक्ष प्रचाराचा झेंडा हा वाहनाच्या डाव्या बाजूला विंड स्क्रिनग्लासच्यापुढे राहणार नाही
 तसेच तो त्यावाहनाच्या टपापासून २ फुट उंची पेक्षा जास्त राहणार नाही. प्रचाराच्या फिरत्या वाहनांवर कापडी फलक वाहन चालकाच्या आसनामागे वाहनाच्या डाव्या व उजव्या बाजूने लावण्यात यावा,इतर कोणत्याही बाजूस तो लावता येणार नाही.फिरत्या वाहनांवर लावावयाचा पक्ष प्रचाराचा झेंडा किंवा कापड़ी फलक संबंधित पक्षाचे जिल्हाध्यक्ष,उमेदवार व उमेदवाराचे निवडणूक प्रतिनिधीबनिवडणूक प्रचारासाठी निवडणूक निर्णयअधिकारी यांचेकडून अधिकृत परवानगी घेतलेल्या वाहनाव्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनांवर लावता येणार नाही.

हे आदेश २५ नोवेंबर २०२४ पर्यत अंमलातराहतील. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितहे लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ मधील तरतुदीनुसार व भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २२३ प्रमाणे दंडनीय कार्यवाहीस पात्र राहतील.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test