माळेगाव बु. येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नामकरण समारंभाचे आयोजन
बारामती.: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत माळेगाव बु. येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा नामकरण समारंभ मंगळवार, ८ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३० वा. आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती संस्थेचे प्राचार्य अवधुत जाधवर यांनी दिली आहे.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या ४ ऑक्टोबर रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयान्वये राज्यातील २६ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे नाव बदलण्यास मान्यता देण्यात आली असून त्यामध्ये अनंतराव पवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे नामकरण करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
तरी या कार्यक्रमास माळेगाव बु. सह परिसरातील अधिकाधिक नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. जाधवर यांनी केले आहे.