सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील विद्या प्रतिष्ठानचे सोमेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेज सी.बी.एस.ई वाघळवाडी  येथे दिवाळीनिमित्त मुलांना फटाके व त्यापासून लागणारी आग तसेच पर्यावरण व सभोवतालच्या प्राणीमात्रावर होणारा दुष्परिणाम समजावा यासाठी शाळेतील आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे ज्युबिलियंट इनग्रेव्हीया लि. निरा यांच्यातर्फे अग्निशमन पथकाने आपत्ती व्यवस्थापनाची माहिती दिली. 
आग लागण्याचे वेगवेगळे प्रकार व त्यांना विझवण्यासाठी असणारी विशिष्ट वेगवेगळे अग्निशामक उपकरणे याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
तसेच शाळेच्या मुख्य मैदानावर प्रात्यक्षिकाचे आयोजन करत आग विझविण्याचे प्रात्यक्षिक पाहून मुलांनी कृतीतून आग विझविण्याचा अनुभव घेतला. 
यावेळी ज्युबिलियंट इनग्रेव्हीयाचे विनोद होनगेकर, इसाक मुजावर, अजय ढगे, सूर्यकांत मालवडे व सायली फडे यांनी उपस्थिती दर्शवली.
इयत्ता १ ते १२ पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावत प्रात्यक्षिकांचा अनुभव घेतला.
शाळेचे मुख्याध्यापक सचिन पाठक शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी उपस्थिती दर्शवली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका सवाणे यांनी केले तर शाळेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख वर्षा मांढरे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.



