नोव्हेंबर महिन्यातील जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द
पुणे : भारत निवडणूक आयोगाने घोषित केल्यानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून २५ नोव्हेंबरपर्यंत आदर्श आचारसंहिता लागू राहणार आहे. त्यामुळे आचारसंहिता कालावधीत नोव्हेंबर महिन्यात दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित केला जाणार नाही, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी दिली आहे.