बारामती ! प. पू. जगद्गुरु श्री श्री श्री १००८ डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींचे बारामतीत होणार आगमन
बारामती : प. पू. जगद्गुरु श्री श्री श्री १००८ डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी श्रीक्षेत्र काशी यांचे शुक्रवार दिनांक २२/११/२०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता बारामती नगरीत आगमन होत आहे. शहरातील वीरशैव मंगल कार्यालय भिगवण रोड, बारामती. या ठिकाणी ते येणार आहेत.
दीपावलीच्यापर्वात काशी महास्वामीजींचे दर्शन व आशीर्वचन म्हणजे खऱ्या अर्थाने बारामतीकरांची दिवाळी साजरी होणार आहे.
या मंगलप्रसंगी सर्व समाज बंधू आणि भगिनींनी सदभक्तांनी उपस्थितीत राहून धर्मसभा, आशीर्वचन व दर्शन या पर्वणीचा लाभ अवश्य घ्यावा असे अहवान वीरशैव लिंगायत समाज बारामती यांनी केले आहे.