सोमेश्वरनगर - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शेंडकरवाडी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाची सुरुवात महेश शेंडकर, समीर शेंडकर, श्रीकांत शेंडकर यांनी सरस्वती पूजन करून केली. मुला मुलींनी आपल्या कलागुनाना वाव देऊन उत्कृष्ट नृत्य सादर केलं.शाळेतील स्नेहसंमेलन ही केवळ विध्यार्थांच्या विकासासाठी आसतात असं नाही.शिक्षकांना ही या निमित्ताने आपल्या कलागुणांना वाव देता येतो.
प्रत्येकाच्या वैशिष्ट्यांनुसार शाळेतील शिक्षक विध्यार्थांची निवङ करतात.मग सुरू होतात तालमीचे दिवस, स्नेहसंमेलन आयोजित करण्यामागचा उद्देश खऱ्या अर्थाने तोच असतो.शैक्षणिक विकासासह मुलांच्या कलागुणांचा विकास व्हावा.हे शाळेतील शिक्षकांना आपलं कर्तव्य वाटतं.
नोकरीला लागल्यावर अनेकदा आपल्याला मंचावरून बोलावं लागतं.स्वतःचं म्हणणं शांतपणे मुद्देसुद मांडावं लागतं. आशावेळी स्नेहसंमेलन गॅदरींग मधला आपला सहभाग आपल्या मदतीला धावून येतो.स्नेहसंमेलनामुळे विधार्थ्यांना सभाधिटपणा निर्माण होण्यास मदत होते.
विद्यार्थांच्या सर्वागिण विकासात स्नेहसंमेलन मोलाचा वाटा उचलते.
याप्रसंगी निवृत्ती (बिंटूआण्णा) शेंडकर मा. सरपंच ग्रामपंचायत करंजेपुल, चेअरमन करंजे पतसंस्था व प्रियंका राहुल शेंडकर, युवती अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांनी विद्यार्थ्यांची शुद्ध पाणी पिण्याची अडचण ओळखून शाळेस वॉटर पुरीफायर सप्रेम भेट दिली. त्याचा शाळेच्या वतीने स्वीकार मुख्याध्यापक सतीश पिसाळ सर व शिक्षिका हंसा वाळा मॅडम यांनी केला व शाळेच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.
शेंङकरवाङी ग्रामस्थ व महिला वर्गानी उपस्थित राहून सहकार्य केले. मुला मुलींना वेशभूषा, तसेच नृत्य प्रशिक्षण सुरज शिंदे व काजल शिंदे वाघळवाङी यांनी दिले. उत्कृष्ट साऊंङ सिस्टीम व ङेकोरेटर्स नियोजन अजित कोळपे यांनी केले. जि.प.शिक्षक सतिशराव पिसाळ,सहशिक्षका हंसा वाळा, अंगणवाङी शिक्षिका रेश्मा शेंङकर , मदतनीस मीनाक्षी बङेकर तसेच शेंङकरवाङीतील युवकांनी सहकार्य केले.
करंजे सोसायटी म व्हॉइस चेअरमन मच्छिंद्र शेंडकर, उद्योजक मयूर शेंडकर, तसेच विराज ओपटिसियन चे मालक सचिन शेंडकर यांच्या सह सर्व ग्रामस्थ व महिला वर्ग उपस्थित होते.