सोमेश्वरनगर (विनोद गोलांडे) - बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या शैक्षणिक संकुलामधील इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, सायन्स, एम. बी. ए या चारही महाविद्यालयांचा मिळून" सोमोत्सव २५२५ हा सांस्कृतिक महोत्सव आठवडाभर विविध उपक्रमांनी संपन्न झाला.
या उपक्रमांतर्गत व्हॉलीबॉल, क्रिकेट, बॅडमिंटन यासारखे मैदानी तसेच बुद्धिबळ, कैरम यासारख्या बुद्धिला कस लावणाऱ्या खेळांचे आयोजन केले जाते. रांगोळी, चित्रकला, मेहंदी कविता, मिमिक्री, शास्त्रीय व लोकनृत्य, वकतृत्व वादविवाद स्पर्धा, फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी अशा एक ना अनेक कलांचा अविष्कार असलेले कलादालन, भारतीय संस्कृतीतील विविधता दर्शवणारा ट्रॅडिशनल डे यांचा समावेश होता.
सोमोत्सव - २५२५ मध्ये विविधगुणदर्शन व पारितोषिक वितरण समारंभ १७ जानेवारी व १८ जानेवारी ला उत्साहात पार पाडला. यात लियाना एन आनंद तसेच गैरी कुलकर्णी या अभिनेत्रीची विशेष उपस्थिती होती. अभ्यासाबरोबर कला गुणांचा विकास केल्यास माझ्यासारखे ग्रामीण भागातून आलेले विदयार्थी कला क्षेत्रात यश संपादन करू शकतात असे मार्गदर्शन 'आई कुठे काय करते' यासीरियल मध्ये काम केलेली अभिनेत्री गौरी कुलकर्णी यांनी केले. जर कोणी अपंग विद्यार्थी असेल, तर त्या स्वतः आणि चित्रपट क्षेत्रातील सहकारी त्यांना मदत करण्यासाठी सदैव पुढे येतील. असे गौरी कुलकर्णी यांनी अपंग विद्यार्थ्यांसाठी मदतीचे आश्वासन दिले. तसेच "लग्नाची वाईफ, वेडिंगची बायको फेम लियाना एन. आनंद यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलचा मर्यादित वापर करण्याचे आवाहन केले. त्यांनी आरोग्याची काळजी, नियमित व्यायाम आणि मानसिक आरोग्य जपण्याचे महत्त्व पटवून दिले.
याप्रसंगी सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष बाळासाहेब कामथे, ज्येष्ठ संचालक राजवर्धन शिंदे, संस्था प्रतिनिधी आनंदकुमार होळकर, सचिव. भारत खोमणे, संचालक प्रणिता खोमणे, लक्ष्मण गोफणे, अभिजीत काकडे, ऋषीकेश गायकवाड, वाघळवाडी सरपंच हेमंत गायकवाड, कार्याध्यक्ष महिला राष्ट्रवादी काँग्रेस सुचिता साळवे, सर्व कॉलेजचे प्राचार्य आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी उभारलेल्या फुड स्टॉलमध्ये शहरी, ग्रामीण, चायनिज पदार्थाचा सर्वानी स्वाद घेतला. डॉ. एस. बी. सूर्यवंशी, प्रा.शशिकांत वाघ, प्रा. सलोनी शहा, प्रा.एस.जी पिंगळे यांच्यासह विदयार्थी प्रतिनिधी नी कार्यक्रमाचे संयोजन केले.
डॉ. संजय देवकर यांनी NEP 2020 च्या अनुशंगाने सोगेश्वर शैक्षणिक संकुलात उपलब्ध असलेल्या विविध अभ्यासक्रम व शैक्षणिक संधीची माहिती आपल्या प्रस्ताविकातून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. चंद्रशेखर भोसले, प्रा. प्रतिमा शिंदे यांनी केले. प्राचार्य एस के हजारे यांनी आभार मानले.