पुणे : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्यामार्फत शिक्षकांसाठी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धा घेण्यात आल्या होत्या ही स्पर्धा सहा गटांमध्ये घेण्यात आली होती. स्पर्धेत इयत्ता पहिली व दुसरी या गटामध्ये इंग्रजी विषयांतर्गत शिक्षिका अर्चना नेवसे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळवाडी नाटंबी तालुका भोर यांनी तृतीय क्रमांक पटकावित यश मिळवले
यामुळे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एस. शेंडकर यांच्या हस्ते पुणे येथील परांजपे प्राथमिक विद्यालय व माध्यमिक राठी विद्यालय येथे सत्कार समारंभ पार पडला.
यावेळी रोख रक्कम व प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले. हा गौरव सोहळा यावेळी गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे, केंद्रप्रमुख सुषमा पाटील व मुख्याध्यापक योगेश खोपडे यांनी अभिनंदन केले. तर नेवसे यांच्या यशामध्ये डॉ. अतुल नेवसे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.