Crime news तडीपार आरोपींवर गुन्हा दाखल
बारामती - बारामती तालुक्यातील माळेगाव पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील मौजे माळेगांव बु. ता.बारामती जि.पुणे या गावातील सराईत गुन्हेगार 1) महेश उर्फ एक्का दत्तात्रय काशीद 2) सुरज उर्फ माउली सोमनाथ काशीद दोघे रा. मेडद ता बारामती जि.पुणे यांना मा.हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधिक्षक सो पुणे ग्रामीण यांचेकडील जा.क्र. स्था.गु. शाखा /माळेगाव/मपोकाक 55/969/2025 पुणे दि. 12/02/2025 अन्वये 01 वर्षे कालावधीकरीता संपुर्ण पुणे जिल्हा हददीमधुन (पुणे शहर व पिंपरी चिचवड आयुक्तालयासह) तसेच सातारा जिल्हयातील फलटण तालुक्यातुन हद्दपार केलेले असताना देखील त्यांनी वरील नमूद प्रतिबंधित क्षेत्रात आदेशाचा अवमान करून विनापरवाना प्रवेश करून पुन्हा कोणता तरी दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने मौजे मेडद गावचे हद्दीत वावरत असल्याची गोपनीय माहिती माळेगांव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी स.पो.नि. श्री.सचिन लोखंडे यांना मिळाल्याने त्यांनी गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक .देविदास साळवे यांचे पथकाला तात्काळ तडीपार आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेणे व कायदेशीर कारवाई करणेचे आदेश दिलेले होते.
त्या अनुषंगाने दिनांक 22/04/2025 रोजी दुपारी 02.15 वा चे सुमारास मौजे मेडद ता.बारामती जि.पुणे या गावातील श्री.काळभैरवनाथ मंदीर परिसरात वावरताना मिळून आलेने त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे विरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल अमोल संदिपान राऊत यांनी ठाणे अंमलदार पोलीस हवालदार सादिक सय्यद यांचेकडे दिलेल्या फिर्यादीवरून माळेगांव पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नंबर 100/2025 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 142 अन्वये कायदेशीर गुन्हा दाखल केलेला आहे.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार प्रवीण वायसे हे करीत आहेत.