बारामती : जळोची भिमनगर समाज मंदीर येथे बुध्द पौर्णिमे निमित्त बुध्द वंदनेचा कार्यक्रम पार पडला.सकाळी १० वाजता बुद्धपुजा व सामुहिक बुध्दवंदना घेण्यात आली.त्रिसरण पंचशिल ग्रहण करुण अभिवादन करण्यात आले.
यावेळी मनोहर जमदाडे सर यांनी बोलताना सांगीतले की भगवान बुध्दांचे विचार जिवनात आत्मसात केले तर चांगले जिवन जगण्याचा मार्ग मिळेल दु:ख मुक्तीतून मार्ग काढायचा असेल तर बुध्दांच्या शांततेच्या मार्गाशिवाय तोरणापाय नाही असे सांगीतले.
यावेळी प्रताप पागळे,दिपक मलगुंडे,अतुल बालगुडे,माणिक मलगुंडे,अर्जुन पागळे,धनंजय जमदाडे,भिवा मलगुंडे,सत्यवान गोफणे,दत्तु गोसावी,झुबंर सातकर,प्रमोद ढवाण,गणेश पागळे,शेखर सातकर,अक्षय शेरे,नवनाथ मलगुंडे,हौसेराव देवकाते,भगवान मलगुंडे,दादा शेरे,गणपत सुळ,श्रीरंग जमदाडे,गणेश मासाळ,नाना जमदाडे,महेंद्र सातकर,मच्छिंद्र शेंडगे,योगेश मलगुंडे,किशोर सातकर,गणेश मासाळ,अजिंक्य सातकर जळोची ग्रामस्थ व समाज बांधव उपस्थित होते.तसेच स्वप्निल कांबळे,शैलेश बगाडे,मोहन कांबळे यांनी उपस्थितांना खीरदान वाटप केले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन बौध्द युवक संघटना जळोची यांच्या वतीने करण्यात आले होते.