करंजेपूल येथे जिवंत सातबारा मोहिमेला सुरुवात ; शेतकऱ्यांचा वेळ पैसा व कचेरीतील हेलपाटे वाचणार.
सोमेश्वरनगर - करंजेपूल (ता.बारामती ) महसूल मंडळात जिवंत सातबारा मोहिमेला सुरवात झाली आहे. या मोहिमेअंतर्गत करंजेपूल मंडळातील सहा साजेतील गावांमध्ये ४९ मयत खातेदार शोधून त्यांच्या वारसांचे अर्ज नुकतेच भरून घेतले आहेत.त्यामुळे मयतांची नावे कमी होऊन जमीन ७/१२ वर वारसांच्या नोंदी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.या मोहिमेत तहसीलदार गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी अजित मोहिते, ग्राम महसूल अधिकार अक्षय तुकाराम कदम,संजय खाडे यांनी मयत खातेदार शोधून त्यांच्या वारसांचे अर्ज भरून घेण्याचे काम वेगात सुरू केले आहे.या मोहिमेमुळे शेतकऱ्यांचा वेळ पैसा व कचेरीतील हेलपाटे वाचणार आहेत.