Type Here to Get Search Results !

परवानगी न घेता बैलगाडा शर्यती भरवल्याने गुन्हा दाखल.... यापुढे असे दर्शनास आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल - पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे

परवानगी न घेता बैलगाडा शर्यती भरवल्याने गुन्हा दाखल.... यापुढे असे दर्शनास आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल - पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे

मिळालेल्या माहितीनुसार 
1) वडगाव निंबाळकर पो स्टे गु.र.नं:- 155/2025 बी एन एस 223,125 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 110,112

2) फिर्यादी :-निलेश चंद्रकांत जाधव पो. कॉ.बं.नं 2697 नेमणुक वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन अंकीत करंजेपुल पोलीस दुरक्षेत्र मो. नं.9158229707

3) आरोपी :- 1) ओंकार प्रदिप काकडे 2) राजेंद्र बाबुराव काकडे, 3) हर्षवर्धन चंद्रशेखर जगताप काकडे, 4) सुजित सर्जेराव काकडे, 5) रोहित गोंडे, 6) राजवर्धन चंद्रशेखर काकडे 7) सार्थक काकडे, 8) ओंकार गोंडे सर्व रा.निंबुत ता. बारामती जि.पुणे

4) गुन्हा घडला :- ता. 29/5/2025 रोजी दुपारी 12.45 वा.चे सुमारास मौजे निंबुत ता. बारामती जि.पुणे गावचे हददीत निरा मोरगाव रोडलगतचे पठारावर  

5) हकिकत :- वर नमुद केले तारखेस वेळी व ठिकाणी यातील आरोपी 1 ते 8 यांनी पोलीस स्टेशनची, तसेच प्रशासनाची परवानगी न घेता सतीश टेंगले यांचे मालकीचे जमीन गट नं 225 मध्ये परस्पर बैलगाडा शर्यती भरवुन त्यांनी बैलगाडा शर्यतीचे अनुशंगाने वैदयकिय अधिकारी, अँम्बुलन्स, पोलीस बंदोबस्त, शर्यतीचे ठिकाणी कोणतेही बरेकेटींग नव्हते, तसेच सुरक्षीततेच्या कोणत्याही उपाययोजना न करता बैलगाडा शर्यती भरवुन तेथे जमलेल्या लोकांचे जिवीतास व सुरक्षीततेस धोका पोहचेल असे कृत्य करुन पोसई साबळे यांनी सदर आयोजकांना सदर चालु असलेल्या बैलगाडा शर्यत या थांबविणेबाबत तोंडी आदेश करुन देखील त्यांनी बैलगाडा शर्यती न थांबवता चालुच ठेवुन सार्वजनीक ठिकाणी मोठ मोठयाने आरडा ओरड करुन लोकसेवकाने दिले आदेशाचा अवमान करुन तेथे जमलेल्या लोकांचे जिवीतास व सुरक्षीततेस धोका पोहचेल असे कृत्य केले आहे वगैरे मजकुराची फिर्याद करंजेपुल दुरक्षेत्र खबर नं 96/2025 अन्वये आलेने सदरचा गुन्हा रजिस्टरी दाखल केला असुन गुन्हयाचा वर्दी रिपोर्ट मा.प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सो कोर्ट बारामती यांचे कोर्टात रवाना करण्याची तजवीज ठेवलेली आहे.पुढील तपास वडगांव पोलिस  ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करंजेपूल दुरक्षेत्र चे पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे सह पो.हवा.कडवऴे हे करीत आहेत. 

......
सर्व बैलगाडा क्षेत्रातील शेतकरी बैलाचे मालक यांना वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन कडून कळवण्यात येत आहे की आपण ज्या ठिकाणी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले आहे त्या ठिकाणी आयोजकांनी कायदेशीर परवानगी घेतली आहे अगर कसे याची खात्री केल्याशिवाय त्या ठिकाणी आपण शर्यती करता जाऊ नये अन्यथा अशीच कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 
पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test