नातेपुते ग्रामीण रुग्णालयात थॅलेसेमिया दिन साजरा
वाल्हे प्रतिनिधी-सिकंदर नदाफ
नातेपुते(ता. माळशिरस) येथील ग्रामीण रुग्णालयात 'जागतिक थॅलेसेमिया दिन' साजरा करण्यात आला .
या कार्यक्रमात उपस्थित रुग्णांना मार्गदर्शन करताना वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता व्होरा म्हणाल्या थॅलेसेमिया हा रक्ताशी संबंधित आजार आहे'जो पालकांकडून त्यांच्या मुलांपर्यंत पसरतो. पण आजही या आजाराबाबत लोकांमध्ये अनेक समज- गैरसमज आहेत. अशा परिस्थितीत या आजाराची लोकांना योग्य माहिती मिळावी आणि जगभरात त्याबद्दल जनजागृती व्हावी या उद्देशाने दरवर्षी आंतरराष्ट्रीय थॅलेसेमिया दिन साजरा केला जातो.
या प्रसंगी नातेपुते ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोष खडतरे यांसह डॉ. नरेंद्र कवितके डॉ. शिवाजी शेंडगे डॉ.माने मॅडम सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.