Type Here to Get Search Results !

सोमेश्वरनगर! संत सोपानकाका पालखीसाठी केंजळेंची बैलजोडी.....चौथ्या पिढीने जपली परंपरा

सोमेश्वरनगर! संत सोपानकाका पालखीसाठी केंजळेंची बैलजोडी.....चौथ्या पिढीने जपली परंपरा


संत सोपानकाका पालखी सोहळ्यासाठी सोरटेवाडी येथून बैलजोडी पाठविण्यात आली. (छाया: जे. के. फोटो)

सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येथील केंजळे परिवाराच्या चौथ्या पिढीने संत सोपानकाका पालखी सोहळ्यासाठी स्वः मालकीची बैलजोडी पाठविण्याची परंपरा जपली आहे. बुधवारी दि. १८ रोजी शेतकरी कृती समितीअध्यक्ष सतीशराव काकडे आणि ज्येष्ठ ग्रामस्थ नामदेवराव गायकवाड व सोमेश्वर पंचक्रोशीतील मान्यवर ग्रामस्थांच्या उपस्थितीत टाळ मृदंगांच्या गजरात विधिवत पूजा करण्यात आली.

संत सोपानकाका पालखीचा रथ ओढण्याचा मान सुमारे १२५ वर्षांपासून केजळे परिवाराला मिळत आहे. पंढरपूर एकादशीला पादुकांना स्नान घालणे तसेच पालखी बारामतीतील सोरटेवाडी येथे आगमनानंतर ती महाअभिषेक करणे, याचाही मान केंजळे परिवाराला आहे.

केंजळेवाड्यात पूजन करून बैलजोडी पुन्हा वाड्यात बांधण्यात आली. रविवारी (दि. २२) बैलजोडी सासवडकडे पाठविण्यात येणार आहे.या वेळी 'सोमेश्वर'चे संचालक ऋषिकेश गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, भीमराव बनसोडे, नितीन सोरटे, सोमनाथ सोरटे, शिवाजी शेंडकर, जालिंदर जगताप, मधुकर सोरटे, एस. एस. गायकवाड, श्रीपाल सोरटे , माणिक लकडे, शरद मगर,सुरेश शेंडकर  तसेच केंजळे परिवारातील नितीन कुलकर्णी, अरविंद केंजळे, माऊली केंजळे,विकास केंजळे, संतोष केंजळे, प्रसाद केंजळे, अरुंधती केंजळे, रागिणी कुलकर्णी, ऋचा केंजळे, माधवी केंजळे आणि सोमेश्वर पंचक्रोशीतील मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.



संत सोपानकाका पालखी सोहळा सोमवारी (दि. २३) सासवडवरून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. २५ जूनला सोहळा बारामती तालुक्यात प्रवेश करणार आहे. पालखी रथासाठी एक आणि नगारा वाहून नेण्यासाठी एक, अशा दोन बैलजोड्या केंजळे कुटुंबीयांच्या वतीने देण्यात आल्या. सुमारे १२५ वर्षांपूर्वी सोपानकाका पालखी सोहळा आकारास आला. सुरुवातीला भोई समाजातील लोक पालखी वाहून नेत असत. काही वर्षांनी बैलांच्या साहाय्याने पालखी ओढून नेता येईल असा रथ तयार करण्यात आला. सोरटेवाडी येथील कै. बापूसाहेब बाळाजी केंजळे हे सोपानकाकांच्या समाधीचे सेवेकरी होते. त्यांच्याकडे सुरुवातीला हा मान होता. त्यानंतर त्यांच्या चौथ्या पिढीने ही परंपरा सुरू ठेवली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test