सोमेश्वरनगर - भारतीय पत्रकार संघ बारामती तालुका नवीन कार्यकारिणी बैठक सोमवार दि ९ रोजी करंजे (ता बारामती) रोजी संपर्ककार्यालयात संपन्न झाली , भारतीय पत्रकार संघ बैठकीदरम्यान अध्यक्षस्थानी भारतीय पत्रकार संघ पश्चिम महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष सिकंदर नदाफ होते तसेच पुणे जिल्हा अध्यक्ष तैन्नूर शेख , सचिव काशिनाथ पिंगळे , मावळते तालुकाध्यक्ष विनोद गोलांडे उपस्थित होते.तालुकाध्यक्ष पदासाठी दोन इच्छुक त्यामध्ये सोमनाथ पिसाळ व मधुकर बनसोडे होते यामध्ये मधुकर बनसोडे यांचे नाव पुढे आल्याने तालुकाध्यक्षपदी बनसोडे यांची निवड करण्यात आली तसेच उपाध्यक्ष मोहम्मद शेख तर सचिव शरद भगत यांची निवड झाली तसेच नवनिर्वाचित पुढील कार्यकारणी कार्याध्यक्ष सीमा चोपडे,सहसचिव माधव झगडे,खजिनदार सोमनाथ लोणकर ,प्रसिद्धी प्रमुख जितेंद्र काकडे, हल्लाकृती समिती अजय पिसाळ, संघटक निखिल नाटकर , फिरोज भालदार यांच्या ही पदाची घोषणा करण्यात आली.
अध्यक्षीय भाषणात सिकंदर नदाफ यांनी भारतीय पत्रकार संघ हा महाराष्ट्रातच नव्हे तर 22 राज्यात काम करणारा संघ आहे सर्वांनी एकत्र येत बारामती तालुका भारतीय पत्रकार संघाचे नाव अतिउंच करावे व नवीन कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच पुणे जिल्हाध्यक्ष तैन्नूर शेख यांनीही पत्रकारांसाठी आलेले नवनवीन कायदे व नियम याविषयी मार्गदर्शन केले तसेच जिल्हासचिव काशिनाथ पिंगळे यांनी नवनिर्वाचित कार्यकारणी यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच मावळते तालुकाध्यक्ष विनोद गोलांडे यांनी संघ स्थापनेपासून सर्व एकत्र येत जसे काम केले त्या पद्धतीत पुढेही काम करावे असे त्यांनी बोलताना आपले मत व्यक्त केले.