नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी करंजे येथील रघुनंदन महिला बचत गटातील महिलांनी लाल रंगाच्या साड्या परिधान केल्या होत्या.
विशेष लेख (विनोद गोलांडे) - नवरात्रीचं व्रत करुन दुर्गा मातेची पूजा केली जाते. घटस्थापनेलाच 'कलश स्थापना' म्हटलं जातं.महिषासूर राक्षसाच्या नाश करण्यासाठी अवतार घेणार्या माता दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे नवरात्रौत्सव. महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये नवरात्रौत्सव  उत्साहात साजरा केला जातो. नऊ दिवस देवीच्या नऊ रुपांची मनोभावे पूजा केली जाते. या नवरात्र उत्सवात नऊ रंग आणि त्यांचे महत्त्व विशेष महत्व असते .
 नवरात्रौत्सवास सोमवार २२ सप्टेंबरपासून शुभारंभ या भारतीय संस्कृती प्रमाणे या दिवसाला खूप मोठे महत्त्व आहे विशेष महिला वर्ग आपले कुटुंबासाठी, मनोभावी  देवी दर्शन व घरात घटस्थापना करत असतात. व परिसरातील असणाऱ्या सर्व ठिकाणी देवी दर्शनाला जात असतात.
नऊ रात्रीचे नऊ रंग आणि रंगाचे महत्त्व...
२२ सप्टेंबर २०२५ सोमवार पांढरा रंग ,
मंगळवार लाल रंग (द्वितीया तिथी) ....
 बुधवार, निळा रंग (तृतीया तिथी).... गुरुवार, पिवळा रंग (तृतीया तिथी) ....शुक्रवार, हिरवा रंग (चतुर्थी तिथी)..... शनिवार राखाडी रंग (पंचमी तिथी)....  रविवार, केशरी रंग (षष्टी तिथी)....  सोमवार, मोरपंखी रंग (सप्तमी तिथी). ..मंगळवार, गुलाबी रंग (महाअष्टमी तिथी) 
नवरात्रीच्या नऊ रंगाचे महत्त्व...
पांढरा रंग शांततेचे प्रतीक आहे. 
लाल रंग कृती आणि सामर्थ्याचे प्रतीक मानला जातो.
निळा रंग सुख, समृद्धी आणि शांततेचा प्रतीक आहे.
पिवळा रंग आनंद आणि उत्साहाचे प्रतीक आहे.
हिरवा रंग विकास आणि सुपीकतेचे प्रतीक आहे. 
राखाडी रंग संतुलित विचारांचे प्रतीक आहे. 
केशरी रंग तेज आणि ऊर्जेचे प्रतीक आहे.  
मोरपंखी रंग अद्वितीयतेचे प्रतीक आहे. 
गुलाबी रंग प्रेम, आपुलकी आणि ऐक्याचे प्रतीक आहे.
अशी माहिती ऐकण्यात व सर्व माध्यमातून ऐकण्यात आल्यामुळे माहिती  प्रसिद्ध करत आहे याची नोंद घ्यावी.
 


 

 

 
 
 
 
