भारतीय पत्रकार संघ वतीने त्रंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ निवेदन .
सोमेश्वरनगर - त्र्यंबकेश्वर या ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळा बैठकीच्या निमित्ताने वार्तांकनासाठी गेलेल्या दै. पुढारीचे प्रतिनिधी किरण ताजणे यांसह माध्यम प्रतिनिधी योगेश खरे तसेच अभिजीत सोनवणे यांना शनिवार दि., २० सप्टेंबर २०२५ रोजी तेथील पार्किंग माफीयांनी अमानुषपणे मारहाण करून गंभीर जखमी केले.
सदरची घटना अतिशय निंदनीय असून या घटनेचा भारतीय पत्रकार संघाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करत आहोत.
तसेच पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तींविरोधात नाशिक पोलिसांनी तातडीने पाऊले उचलून त्यांच्या विरोधात विविध कलमान्वये तसेच पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई केल्याने पोलीस प्रशासनाचे देखील आभार व्यक्त करत आहोत.
आदरणीय महोदय आपण देखील बारामती तालुक्यातील सर्वच पत्रकारांना सहकार्याची भूमिका ठेवून पत्रकारांवर हल्ला झाल्यास घटनेची शहानिशा करून पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी कराल अशी अपेक्षा अशा आशियाचे निवेदन बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांना दिले .
यावेळी भारतीय पत्रकार संघ तालुकाध्यक्ष मधुकर बनसोडे मा.अध्यक्ष विनोद गोलांडे ,उपाध्यक्ष मोहम्मद शेख ,संघटक फिरोज भालदार ,प्रेस फोटोग्राफर जितेंद्र काकडे सदस्य अजय पिसाळ सह इतर पत्रकार बांधव उपस्थित होते.
भारतीय पत्रकार संघ वतीने त्रंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ निवेदन
September 23, 2025
0
Tags



