Type Here to Get Search Results !

आजी माजी सैनिक संघटनामार्फत पूरग्रस्तांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे चेक सुपूर्त

आजी माजी सैनिक संघटनामार्फत पूरग्रस्तांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे चेक सुपूर्त
सोमेश्वरनगर प्रतिनिधी- बारामती तालुका आजी माजी सैनिक संघटनेद्वारे आज पूरग्रस्तांना मदत म्हणून ११०००/ -चा चेक मुख्यमंत्री निधीसाठी अजितदादाकडे सोमेश्वर मंदिरामध्ये  सोपवण्यात आला.. यावेळी अजितदादांना ॲड गणेश आळंदीकर यांनी  संघटनेच्या कार्याची माहिती दिली.संघटनेने सुमारे १५० वर वाद कोर्टात अथवा पोलीस स्टेशन मधे न जाता मिटविले आहेत.याशिवाय सैनिक टाकळी येथे पूरग्रस्तांना तीन ट्रॅक मदत तसेच कोरोना काळात व त्यानंतर दरड ग्रस्तांना दोन ट्रॅक धान्य व संसारोपयोगी साहित्य अशी मदत असे काम केले आहे.यांच्याकडे संघटनेच्या कार्याचे दादांनी कौतुक केले. काल झालेल्या शेतकरी मेळाव्याच्या कार्यक्रमात देखील अजितदादांनी भर सभेत सैनिक संघटनेच्या कार्याला सॅल्युट केला. 
  यावेळी संघटनेचे संस्थापक जगन्नाथ लकडे,तक्रार निवारण कमिटी अध्यक्ष ॲड गणेश आळंदीकर, अध्यक्ष ताराचंद शेंडकर,सचिव विजय साबळे व गणेश शेंडकर तसेच सोमेश्वर कारखाना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप उपाध्यक्ष मिलिंद कांबळे इ.मान्यवर हजर होते .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test