पुरंदर - अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसेच अखिल भारतीय ओबीसी विभाग अध्यक्ष डॉक्टर अनिल कुमार जयहिंद यांच्या आदेशाने तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन जी सपकाळ साहेब यांच्या मान्यतेने काँग्रेस ओबीसी विभाग प्रदेशाध्यक्ष भानुदासजी माळी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र बरकडे यांची पुणे जिल्हा काँग्रेस ओबीसी विभाग च्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारत असताना राजेंद्र बरकडे यांनी काँग्रेसचे खासदार आदरणीय राहुलजी गांधी यांची प्रेरणा घेऊन काँग्रेस तळागाळापर्यंत पोहोचवणार असल्याचे सांगितले राजेंद्र बरकडे यांची कॉग्रेस ओबीसी विभाग अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष संग्राम दादा मोहोळ देविदास भन्साळी लहू अण्णा निवंगुणे श्रीरंग नाना चव्हाण निखिल कवीश्वर पृथ्वीराज पाटील अवधूत मते आकाश मोरे आणि पुरंदर काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप आण्णा पोमण साहेबराव फडतरे भैय्या महाजन सचिन दुर्गाडे यांनी अभिनंदन केले.
राजेंद्र बरकडे यांची पुणे जिल्हा कॉग्रेस ओबीसी विभाग च्या अध्यक्षपदी निवड.
September 13, 2025
0
राजेंद्र बरकडे यांची पुणे जिल्हा कॉग्रेस ओबीसी विभाग च्या अध्यक्षपदी निवड.
Tags