Type Here to Get Search Results !

सोमेश्वरनगर. ! मु. सा. काकडे महाविद्यालयास गुजरात मधील शिष्टमंडळाची भेट.

सोमेश्वरनगर. ! मु. सा. काकडे महाविद्यालयास गुजरात मधील शिष्टमंडळाची भेट.
सोमेश्वरनगर: मु. सा. काकडे महाविद्यालयास गुजरात सरकारच्या "लर्निंग अँड एक्सपोजर कम स्टडी टूर फॉर फॅकल्टीज " या नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत गव्हर्मेंट आर्ट्स कॉलेज, मांडल, अहमदाबाद व धर्मेंद्रसिंहजी आर्ट्स कॉलेज, राजकोट या गुजरात राज्यातील दोन महाविद्यालयातील आठ सदस्यीय समितीने गुरुवार दि. १८ सप्टेंबर २०२५ रोजी महाविद्यालयास अभ्यास दौरा म्हणून भेट दिली. यावेळी व्यवस्थापन समितीचे सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष मा. श्री. अभिजीतभैया काकडे देशमुख, व्यवस्थापन समितीचे सचिव सतीश लकडे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी समिती सदस्यांचे स्वागत केले. स्वागत समारंभप्रसंगी महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष मा. श्री. अभिजीतभैया काकडे देशमुख यांनी सर्व सदस्यांचे स्वागत करून महाविद्यालय स्थापनेचा उद्देश व महाविद्यालय परिसराची पार्श्वभूमी याबद्दलची माहिती समिती सदस्यांना करून दिली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी सर्व सदस्यांचे स्वागत करून महाविद्यालयाच्या सर्व कामकाजाची माहिती त्यांच्या अध्यक्षीय भाषणातून दिली. यावेळी समिती सदस्यांमध्ये गव्हर्मेंट आर्ट्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हर्षद परमार, आयक्यूएसी चे समन्वयक डॉ. प्रवीणकुमार राथवी प्रा. संजयकुमार पटेल व डॉ. नितीनकुमार पटेल तर धर्मेंद्रसिंहजी आर्ट्स महाविद्यालयाचे डॉ. मनीष व्यास, डॉ. भावेश कछडीया, डॉ. जगत तेरीया व डॉ. ऋषिराज वाघेला इ. समिती सदस्य उपस्थित होते. सदर अभ्यास दौऱ्या दरम्यान समिती सदस्यांनी महाविद्यालयातील अभ्यासक्रम, अध्यापन, अध्ययन, मूल्यमापन, संशोधन, विस्तारित उपक्रम, भौतिक सुविधा, महाविद्यालयाचे प्रशासकीय व शैक्षणिक नेतृत्व, महाविद्यालयाच्या उत्कृष्ट प्रॅक्टिसेस व महाविद्यालयाचे वेगळेपण या नॅक च्या सात निकषांमधील सर्व घटकांचा अभ्यास करून सर्व कागदपत्र पत्रांचे व्यवस्थापन व प्रक्रिया समजून घेतली. महाविद्यालयातील सर्व विषय विभाग, संशोधन विभाग, विस्तारित विभाग, ग्रंथालय, शारीरिक शिक्षण विभाग, प्रांगण व महाविद्यालयातील 
इकोफ्रेंडली प्रॅक्टिसेस ला भेट देऊन दैनंदिन कामकाजाची पद्धती, त्याची रचना व अंमलबजावणी प्रक्रिया या बाबी समजून घेतल्या. महाविद्यालयातील सर्व शिक्षक व प्रशासकीय कर्मचारी यांच्याशी संवाद साधून संबंधित विभागातील शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजाची पद्धती समजून घेतली व महाविद्यालयाच्या दैनंदिन कामकाज, महाविद्यालय विकास, मूल्यमापन, संशोधन ,महाविद्यालयला प्राप्त झालेले पुरस्कार व एकूणच विद्यार्थी विकास या सर्व गोष्टींचे कौतुक त्यांनी समारोप समारंभातील त्यांच्या भाषणातून व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी महाविद्यालयाचे दैनंदिन कामकाज, प्राध्यापकांची कामावरील निष्ठा व महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. श्री.सतिशभैय्या काकडे देशमुख यांची बहुमोल साथ व मार्गदर्शन इ. गोष्टींचा उल्लेख त्यांनी त्यांच्या समारोप अध्यक्षीय भाषणातून केला. यावेळी महाविद्यालयाचे सर्व उपप्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सदर अभ्यास दौऱ्याचे नियोजन, प्रस्ताविक व आभार इंग्रजी विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. संजय जाधव यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test