सोमेश्वरनगर - अनावश्यक खर्च टाळत सामाजिक उपक्रम म्हणून नवरात्री उत्सव निमित्त बारामती तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंजेपूल येथे शालेय साहित्य मध्ये वह्या व खाऊ वाटप कार्याध्यक्ष सौ. रेखाताई सचिन शितोळे व सौजन्य प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टरबीकिसन पाटील ,बुवा इथापे, महालक्ष्मी नवरात्र उत्सव व नवनाथ गणेश तरुण मंडळ करंजपूल वतीने करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये करंजेपुल उपसरपंच प्रवीण गायकवाड ,माजी उपसरपंच निलेश गायकवाड होते.
या कार्यक्रम वेळी मंडळाचे सभासद संतोष पवार,सिद्धार्थ वाघमारे, संतोष भुजबळ,मयूर शिंदे , तुषार भिंगारे,गणेश वाघमारे,प्रथमेश जाधव , साजिद पठाण , चेतनाताई यादव ,सुवर्णाताई जाधव , राधा भगत , सानिया शेख ,राधा शिंदे ,कांचन शिंदे उपस्थित होते.



