Type Here to Get Search Results !

अभिमानास्पद ! विद्या प्रतिष्ठान सोमेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज (CBSE) ला "सर्वोत्तम शाळा" म्हणून सन्मान

अभिमानास्पद  !  विद्या प्रतिष्ठान सोमेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज (CBSE) ला "सर्वोत्तम शाळा" म्हणून सन्मान
सोमेश्वरनगर - बारामती १६ सप्टेंबर: एज्युकेशन टुडे – इंडियाज प्रीमियम एज्युकेशन मॅगझिन तर्फे जाहीर करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्कूल रँकिंग्स 2025 मध्ये विद्या प्रतिष्ठान्स सोमेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज (CBSE) या शाळेला “ *विद्यार्थ्यांकडे व्यक्तिगत लक्ष” या विभागात सर्वोत्तम शाळा म्हणून निवडण्यात आले आहे.* 

ही निवड शाळेच्या शैक्षणिक उत्कृष्टतेची, नाविन्यपूर्ण उपक्रमांची, नेतृत्वगुणांची तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या प्रयत्नांची दखल म्हणून करण्यात आली आहे.

या निमित्ताने शाळेला महाराष्ट्र एज्युकेटर्स समिट अँड अवॉर्ड्स 2025 या राज्यस्तरीय कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले . हा समारंभ १२ सप्टेंबर २०२५ रोजी मुंबईतील द ललित हॉटेलमध्ये सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत पार पडला. राज्यातील प्रमुख शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ व संस्थांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.

या गौरवाचा विशेष क्षण एज्युकेशन टुडे या मासिकाच्या ऑक्टोबर २०२५ अंकात प्रसिद्ध होणार आहे. या मासिकाचा वाचकवर्ग १२ लाखांहून अधिक असून, ६२,००० प्रतींचे वितरण व १५,००० बोनस प्रती विविध प्रतिष्ठित शाळा, वाचनालये आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांपर्यंत पोहोचणार आहेत. त्यामुळे शाळेची प्रतिष्ठा व सन्मान यात मोलाची भर पडणार आहे.
हा सन्मान केवळ रँकिंग व पारितोषिकपुरता मर्यादित नसून शाळेच्या दूरदृष्टीचे, नेतृत्वाचेआणि विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे प्रतिबिंब आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test