फलटण/साखरवाडी - जिल्हा परिषदेला अनुसूचित जातीचे आरक्षण पडल्याने विक्रमसिंह भोसले यांची उमेदवारी शक्य नाही, मात्र पंचायत समितीच्या साखरवाडी गणाला ओबीसी महिला आरक्षण मिळाल्याने त्यांच्या कन्या शिवांजली भोसले यांचे नाव चर्चेत आले आहे.
अजितदादा पवार आणि रणजीतदादा निंबाळकर या दोन्ही नेत्यांशी भोसले कुटुंबाचे जवळचे संबंध आहेत. त्यामुळे शिवांजली भोसले यांचा उमेदवारीचा विचार फक्त स्थानिकच नव्हे, तर राजकीय पातळीवरही महत्त्वाचा ठरू शकतो.
तालुक्याच्या राजकारणात नव्या नेतृत्वाचा उदय होईल का? या प्रश्नाचे उत्तर आगामी काही दिवसांत स्पष्ट होईल.