Type Here to Get Search Results !

आंतरराष्ट्रीय धावपटू तसेच जिल्हाधिकारी क्रीडा अधिकारी पदापर्यंत पोचलो ते सोमेश्वर पंचक्रोशी ग्रामस्थांच्या सहकार्याने- जगन्नाथ लकडे.विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रथमेश कोळपे यांचा सत्कार समारंभ.

आंतरराष्ट्रीय धावपटू तसेच जिल्हाधिकारी क्रीडा अधिकारी पदापर्यंत पोचलो ते सोमेश्वर पंचक्रोशी ग्रामस्थांच्या सहकार्याने- जगन्नाथ लकडे.
विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रथमेश कोळपे यांचा सत्कार समारंभ.

सोमेश्वरनगर - सामान्य कुटुंबातील एका मेंढपाळाचा मुलगा आंतरराष्ट्रीय धावपटू तसेच आशियाई स्पर्धेत देशाला ब्राँझ पथक मिळवून देणारे जगन्नाथ लकडे हे बारामतीतील सोमेश्वर नगर करंजेपुल येथील आहेत. त्यांनी बोलताना सांगितले की सोमेश्वर पंचक्रोशीत एखादा खेळाडू जर तयार होत असेल तर सोमेश्वर पंचक्रोशीतील आजी-माजी पदाधिकारी ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभतेच हा माझा अनुभव आहे माझी परिस्थिती नसताना माझ्यातील धावपटू त्यांनी ओळखल्याने सोमेश्वर पंचक्रोशीतील सर्वांनीच मला मोलाची सहकार्य केल्याने मी देशाला कांस्य पदक मिळवून देणारा आंतरराष्ट्रीय धावपटू आणि तालुका क्रीडा अधिकारी पासून चा प्रवास ते आत्ता जिल्हा पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी पर्यंत पोहोचलो असल्याचे बोलताना लकडे यांनी सांगितले. प्रथमेश कोळपे यांनी नुकत्याच झालेल्या अहिल्यानगर येथे राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार आजी-माजी सैनिक संघटना तसेच सोमेश्वर पंचक्रोशीतील सर्वच मान्यवर पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्या वतीने ठेवण्यात आला होता.
  यावेळी ते लकडे बोलत होते कोळपे यांनी राज्य तसेच राष्ट्रीय कुस्तीमध्ये पदक मिळवत अधिकाधिक उंच पदावर जावे मोठे अधिकारी बनावे अशा शुभेच्छा देत कोळपे यांची परिस्थिती हालाखीची असल्याने त्यांना लागणारे सर्व सहकार्य मोलाची सहकार्य सोमेश्वर पंचक्रोशी ग्रामस्थ तसेच आजी माजी सैनिक संघटना यांच्या वतीने नक्कीच करण्यात येईल असेही त्यांनी बोलताना सांगितले.
  प्रथमेश कोळपे याची प्रतिकूल परिस्थिती असल्याने त्याला जगन्नाथ लकडे यांनी स्वखर्चाने त्याला कुस्तीसाठी आवश्यक खुराक व कपड्यांचे किट दिले.तर आजी माजी सैनिक संघटना अध्यक्ष ताराचंद शेंडकर, ॲड गणेश आळंदीकर, सोमेश्वर कारखाना व्हाईस चेअरमन मिलिंद कांबळे ,रमाकांत गायकवाड ,भाऊसाहेब करे,माजी सरपंच वैभव गायकवाड पत्रकार संतोष शेंडकर यांनी दहा हजार रुपयांची मदत दिली.सोमेश्वर चे संचालक ऋषिकेश गायकवाड , मा आरोग्य सभापती भाऊसाहेब करे , ॲड गणेश आळंदीकर यांनी व शुभेच्छा व मनोगत व्यक्त केले. यावेळी स्पोर्टट अकॅडमी भाऊसो लकडे, विनोद गोलांडे, विठ्ठल गायकवाड,अंकुश गायकवाड,लहू सिंह गायकवाड व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test