सोमेश्वरनगर प्रतिनिधी - बारामती तालुक्यातील दहा गावांमध्ये भारत नेट स्मार्ट व्हिलेज योजना राबविण्यात येणार आहे, अशी माहिती बारामती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किशोर माने यांनी दिली.
बारामती तालुक्यातील करंजे येथील ग्रामपंचायत सभागृहात गटविकास अधिकारी माने, पंचायत समिती विस्तार अधिकारी आदित्य शेटे , योजनेच्या अधिकारी स्नेहा गुंड, कुणाल भारवीरकर या अधिकाऱ्यांनी नुकतीच भेट देऊन योजनेची प्राथमिक माहिती ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना दिली. यावेळी पथकाने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा, अंगणवाड्या, ग्रामीण रुग्णालय, पशुवैद्यकीय दवाखान्याला भेट दिली. या सर्व आस्थापनांना इंटरनेटच्या माध्यमातून एकमेकांना जोडले जाणार आहे.
याप्रसंगी करंजे विद्यमान सरपंच भाऊसो हुंबरे ,उपसरपंच , सदस्य ,ग्रामसेवक चंद्रशेखर काळभोर, करंजे तंटामुक्ती अध्यक्ष सचिन पाटोळे सह ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते.
________________________________
या गावांचा समावेश
तालुक्यातील करंजे,सुपे, मोरगाव, वाणेवाडी, मुरूम, पणदरे,गुणवडी, डोर्लेवाडी, पिंपळी, काटेवाडी आदी दहा गावांत भारत नेट स्मार्ट व्हिलेज योजना राबविण्यात येणार आहे.



