सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील विद्या प्रतिष्ठानचे सोमेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, सी.बी.एस.ई वाघळवाडी येथे शनिवार दिनांक १३ डिसेंबर रोजी विद्यार्थी व पालकांसाठी आनंदमेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
मुलांना शाळेच्या व्यस्त वेळापत्रकातून वेगळेपणा अनुभवता यावा या हेतूने मेळाव्याचे आयोजन केले गेले. यावेळी विविध भारतीय व पाश्चात्य पदार्थांची मेजवाणी तसेच गंमतीदार विविध खेळ, डी जे डान्स, थ्रीडी शो व भूतबंगला या वैविध्यपूर्ण गोष्टीचा विद्यार्थी व पालकांनी मनसोक्त आनंद लुटला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन इयत्ता ८ वी अ मधील पालक रतनलाल चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. प्रमुख पाहुण्यांनी प्रत्येक स्टॉलला भेट देत आनंदमेळाव्याची मजा लुटली. शाळेचे मुख्याध्यापक सचिन पाठक सर यांच्या मार्गदर्शनानुसार रेश्मा गावडे व निशा मिसाळ यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले.
शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला. सोमेश्वरनगर व परिसरातील सर्व पालक, विद्यार्थी व नागरिकांना मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शवत मेळाव्याचा आनंद लुटला.



