ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या वापरामुळे ८ एकर ऊस आगीपासून वाचविण्यात ग्रामस्थांना यश
बारामती प्रतिनिधी - बारामती तालुक्यातील मेखळी गावातील विठ्ठल देवकाते व शिवाजी भोसले यांच्या ऊसाला दुपारी बुधवार दुपारच्या सुमारास आग लागलेली आहे हे कळताच,गावचे सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील भोसले यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या हेल्पलाइन (18002703600) नंबरवरून ही माहिती संपूर्ण गावाला कळवली आणि काही वेळातच तेथे गावातील गावकरी मदतीसाठी आले व ऊसाला लागलेली आग ग्रामस्थांच्या मदतीने विजवण्यात आलेत तर उर्वरित ८ एकर ऊस आगीपासून वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले.
मेखळी ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच,ग्रामपंचायत सदस्य,ग्रामपंचायत अधिकारी व पोलीस पाटील यांच्या प्रयत्नातून गावात ग्राम सुरक्षा यंत्रणा प्रभावी राबविली जात आहे.आजवर मेखळी गावात ग्रामसुरक्षा यंत्रणेचा विविध सूचना देण्यासाठी १७ वेळा वापर करण्यात आला आहे.



