बारामती तालुक्यातील सुपा पोलीस स्टेशन हद्दीत विविध ठिकाणाहुन मोबाईल हॅण्डसेट गहाळ झालेबाबत सुपा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल होत्या, सदर गहाळ मोबाईलचा शोध घेणे बाबत प्रभारी अधिकारी मनोजकुमार नवसरे सहा पोलीस निरीक्षक यानी गुन्हे शोध पथकाचे पोलीस अमंलदार किसन ताडगे व महादेव साळुंके याना आदेश दिले होते. गुन्हे शोध पथकाचे पोलीस अमलदार यानी गहाळ झालेले मोबाईल्या तांत्रिक दृष्टया तपास करून त्याचे विश्लेषण करून गहाळ झालेले विविध कंपनीचे ०७ मोबाईल हॅण्डसेट विविध भागातुन तसेच परराज्यातुन हस्तगत केले आहेत. हस्तगत केलेले विविध कंपनीचे ०७ मोबाईल हण्डसेट कि.रू १,२५,०००/- रू किंमतीचे प्रभारी अधिकारी मनोजकुमार नवसरे सहा. पोलीस निरीक्षक सुपा पोलीस स्टेशन यांचे हस्ते तकारदार याना सपुर्द करण्यात आले आहेत.
सदरची कामगिरी ही मा. संदीप गिल्ल सो, पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण, मा. गणेश बिरादार सो अप्पर पोलीस अधिक्षक, बारामती विभाग, मा. सुदर्शन राठोड साो, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग, यांचे मार्गदर्शनाखाली सुपा पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक श्री मनोजकुमार नवसरे साो, पोलीस उपनिरीक्षक जिनेश कोळी, गुन्हे शोध पथकाचे अमंलदार किसन ताडगे, महादेव साळुंके यांनी केली आहे.



