सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील प्रति सोरटी सोमनाथ यांचे रूप मानले जाणारे प्रसिद्ध श्री क्षेत्र करंजे येथील श्री सोमेश्वर स्वयंभू शिवलिंग मंदिरात येणाऱ्या रविवारी दि. १५ रोजी महाशिवरात्री यात्रा असणार आहे या अनुषंगाने विविध जिल्ह्यातून येणाऱ्या शिवभक्त भाविक स्वयंभू शिवलिंग दर्शन घेण्यासाठी येत असतात. येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून दरवर्षी सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट विविध सुख सोयी दर्शन रांगा पाणी याचे आयोजन करत असते महाशिवरात्र यात्रेची जय्यत तयारी केली आहे. यात्रेनिमित्तमंदिर परिसरात साफसफाई करण्यात आली. तसेच आकर्षक विद्युत रोषणाई, भाविकांसाठी पार्किंग आणि मंदिर परिसरात साफसफाई करण्यात आली. तसेच आकर्षक विद्युत रोषणाई, भाविकांसाठी दर्शन रांगेची सोय, पिण्याच्या पाण्याची सोय अशा विविध सोयी करण्यात आलेले आहे
महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे. सोमेश्वर कारखान्याच्या वतीने सुरू असलेल्या अतिरुद्र अनुष्ठान सोहळ्याची सांगता महाशिवरात्रीला होणार आहे. वडगाव निंबाळकर ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी मंदिर परिसराची पाहणी करून सुरक्षेचा आढावा घेतला. भाविकांनी शिस्तीत दर्शन घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित केले आहेत. काही स्वयंसेवकही याठिकाणी उपलब्ध करण्यात आले आहेत. बारामती आगाराकडून यात्रेसाठी जास्तीच्या बस सोडण्यात आल्या आहेत. होळ प्राथमिक आरोग्य विभागही सेवेसाठी उपलब्ध असेल. भाविकांनी शिस्तीत दर्शन घेत देवस्थानला सहकार्य करावे, असे आवाहन सोमेश्वर देवस्थानचे अध्यक्ष अनंता मोकाशी, सचिव विपुल भांडवलकर यांनी केले आहे.



