Type Here to Get Search Results !

बारामतीतील श्री क्षेत्र मळद येथून महाशिवरात्रीनिमित्त "जय गिरनारी" पायी पालखी सोहळा प्रस्थान .


बारामतीतील श्री क्षेत्र मळद येथून महाशिवरात्रीनिमित्त "जय गिरनारी" पायी पालखी सोहळा प्रस्थान .
बारामती: दरवर्षीप्रमाने श्री क्षेत्र  मळद येथून १० फेब्रुवारी रोजी सालाबाद प्रमाणे  जय गिरनारी पायी पालखी सोहळा सुरू झाला असून आजचा मुक्काम बारामती मेहुलकुमार गुजर सेठ गुजर इस्टेट हरिकृपा नगर येथे होणार आहे. या सोहळयात हजारो महीला, पुरूष ,तरूण ,दत्त भक्त सहभागी झाले आहेत . हरिकृपा नगर येथे हजारो दत्त भक्तांचे उपस्थित  घोड्याचे पहीले रिंगण पार पडले . हा पालखी सोहळा उद्या दिनांक ११ फेब्रुवारी रोजी  सकाळी बारामती येथून माळेगाव मार्गे  पणदरे येथे  श्री भैरवनाथ मंदिर  मुक्कामी जाणार आहे. दिनांक 12 फेब्रुवारी रोजी पणदरे येथून कोराळे वडगाव निंबाळकर मार्गे श्री क्षेत्र  सोमेश्वर, करंजे येथे मुक्काम होणार असून तिथे घोड्याचे दुसरे रिंगण होणार आहे. दिनांक १३ फेब्रुवारी रोजी श्री क्षेत्र करंजे येथून पायी पालखी सोहळा सोमेश्वर कारखाना, निरा, दत्त घाट, मार्गे लोणंद ज्ञानेश्वर माऊली  महाराज पालखी तळ येथे मुक्कामी जाणार आहे, दिनांक १४ फेब्रुवारी  रोजी लोणंद येथून हा पालखी सोहळा एमआयडीसी लोणंद मार्गे भैरवनाथ मंदिर वाघोशी येथे मुक्कामी जाणार आहे, दिनांक १५ फेब्रुवारी रोजी वाघोशी ता खंडाळा येथून द-यातील मारुती मंदीर येथे महाशिवरात्री एकादशी निमीत्त फराळ होणार आहे.    हा पायी पालखी सोहळा श्री क्षेत्र वलझडवाडी क्षेत्रावर संध्याकाळी पाच वाजता पोहोचणार असून तिथेही  घोड्याचे उभे  रिंगण व तिसरे गोल रिंगण होणार आहे.हा सोहळा  मजल दरमजल करीत श्री क्षेत्र वलझडवाडी येथे हजारो दत्त भक्तांचे उपस्थित पोहचणार असून तिथेही महाशिवरात्री एकादशी निमीत्त रात्री बारा वाजता बेलफुले वाहण्याचा कार्यक्रम नियोजन असते . त्यानंतर श्री.क्षेत्र वलझडवाडी येथे जय गिरनारी, दत्त दत्त नवनाथ  नामघोषात दत्त नवनाथ गिरनारी टेकडी ला तीन पालखीच्या प्रदक्षिणा घातल्या जातात. आणि सकाळी सात वाजता महाप्रसाद  देण्यात देतो. ह्या  पालखी सोहळयात  कोल्हापूर,सांगली सातारा बारामती पूणे  बीड सर्व समाजाचे लोक सहभागी होऊन दत्त संप्रदाय नवनाथ संप्रदाय दिलेल्या शिकवणीप्रमाणे सद्गुरू पडळकर महाराज यांच्या मार्गदर्शनाने आशीर्वादाने हा पालखी सोहळा संपन्न होत असतो या पालखी सोहळ्यामध्ये हजारो भाविकांनी सहभाग घेतला असून प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी जेवणाची सोय,पायी  प्रवासात पालखी सोहळ्यामध्ये चहा नाष्ट्याची जागोजागी दत्त भकत सोय करतात. असा हा पालखी सोहळा १० फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान संपन्न होत असून संध्याकाळी भजनाचा कार्यक्रम असतो यानिमित्ताने सर्व दत्त भक्तांनी या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होऊन आनंद घ्यावा.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test