Type Here to Get Search Results !

बारामतीतील वाणेवाडी येथे कराटे स्पर्धा उत्साहात संपन्न

बारामतीतील वाणेवाडी येथे कराटे स्पर्धा उत्साहात संपन्न

सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथे कराटे स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडल्या. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, शारीरिक तंदुरुस्ती आणि क्रीडाभावना वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन न्यू इंग्लिश स्कूल, वाणेवाडीचे मुख्याध्यापक मा. मानसिंग जाधव सर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे चीफ मास्टर धनंजय भोसले, सुनील भोसले, विक्रम भोसले, अशोक भोसले, विक्रम जगताप व अनिल यादव उपस्थित होते.
संस्थेचे ग्रँडमास्टर प्रकाश रासकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कराटे हे केवळ स्वसंरक्षणाचे साधन नसून व्यक्तिमत्त्व विकासासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले. तसेच शिस्त, आत्मविश्वास आणि मानसिक बळ वाढविण्यासाठी कराटेचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
या स्पर्धेत सोमेश्वरसह बारामती परिसरातील मुला-मुलींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्पर्धेपूर्वी विद्यार्थ्यांना ब्लॅक बेल्ट मास्टर तन्वी रणवरे यांनी मार्गदर्शन केले.
स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे :
यलो बेल्ट :शिवांश गायकवाड, प्रत्युष हुंबरे, प्रणिल हुंबरे
ऑरेंज बेल्ट :इंद्राश काकडे, निश्ना काकडे
ग्रीन बेल्ट :युग चव्हाण, दिव्यांश कारंडे, अन्विका कारंडे, कार्तिकी कारंडे
ब्लू बेल्ट :पेक्षा वायाळ, विशीत बाविसकर, सोहम वायाळ, सर्वज्ञ वायाळ
पर्पल बेल्ट (सेकंड) :वरदराज निलाखे
स्पर्धेत सहभागी विद्यार्थी :खुशी आतार, सोम्या खटावकर, समृद्धी कारंडे, श्रावणी कुदळे, सियोन गायकवाड, शारोन गायकवाड, श्रेयांश जाधव, आर्या जाधव, कादंबरी थोपटे, ग्रीष्मा बाविसकर, गिरीजा नवाथे, स्वराज भोसले, आर्यन थेऊरकर.
   स्पर्धेतील सर्व विजेत्यांना व सहभागी विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. पालकांनी विद्यार्थ्यांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करत आयोजकांचे कौतुक केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test